ही साईट 1024 गुणीले 768 किंवा त्याहून अधिक रिझॉल्युशनमध्ये सर्वोत्तमप्रकारे पाहता येईल

 

निसर्गस्नेही "वृक्षमित्र वह्या"

 

(परत पहिल्या पानाकडे)


 

 

१९५० मध्ये आपल्या पृथ्वीतलावर जेवढी जंगले होती, त्याच्या निम्म्याहून कमी आता ती उरली आहेत. वृक्षतोडीमुळे पृथ्वी तापते आहे; जमीन धुपते आहे; पाउस अनियमित होत आहे आणि वाळवंटे विस्तारत आहेत.

वृक्षतोडीचे प्रमुख कारण आहे :  कागद! कागद-निर्मितीसाठी जगभर प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होते. त्या प्रक्रियेतील घातक रसायने खूप प्रदूषणही करतात.

वनांचा, पर्यावरणाचा हा विनाश रोखण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कागदाची बचत करुन आपण हा विनाश कमी तरी करु शकतो.

निसर्गस्नेही वृक्षमित्र वही - नेहमीच्या वहीतील पानाच्या वर उगीचच कोरी जागा असते. ती वाया न घालवता लिहिण्यासाठी वापरल्याने ९६ पानांच्या वहीमध्ये (१०० पानी वही या व्यावहारिक नावाने ओळखली जाणारी वही) एरवीच्या ११३ पानांमध्ये जेवढ्या ओळी असतात तेवढ्या ओळी मिळू शकतात. म्हणजे प्रत्येक वहीमागे १७ पानांची बचत! एका बाजूने ही बचत पैशांची आहे, तर दुस-या बाजूने कागदाची आणि वृक्षांची!

अशाप्रकारे बनविलेली वही शाळेमध्ये वापरण्यासाठी शिक्षक, पालक व विद्यार्थी यांचा समन्वय व एकवाक्यता गरजेची आहे. तसेच अशाप्रकारच्या वह्यांची निर्मिती होणेही आवश्यक आहे. "महाएज्युटेकनेट" टीम यासाठी समन्वयकाची भूमिका पार पाडायला उत्सुक आहे. ही संकल्पना राबवू इच्छिणा-या शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांनी ९२७२ ७४३ २१२ या मोबाईल क्रमांकावर किंवा cyberedutech@gmail.com या इमेल आयडीवर संपर्क करावा.

निसर्गस्नेही वृक्षमित्र वहीची मूळ संकल्पना श्री. दिलीप कुलकर्णी यांची आहे.

 

 

संपर्क cyberedutech@gmail.com