गणित - आपल्या रोजच्या
आयुष्यात शोधायला गेलो तरी ठायी ठायी गणित सापडेल. आईची गोल होणारी
पोळी, कुंभाराच्या चाकावर तयार होणारे मातीचे भांडे यामध्ये भूमिती
नाही तर काय आहे? भाजीवाल्यांकडून भाजी घेताना आपण पाच-सहा वेगवेगळ्या
भावाच्या भाज्या वेगवेगळ्या वजनांच्या घेतो, पण आपल्या आधी भाजीवाले
हिशेब करुन पैसे किती ते सांगतात. घरे बांधणारे गवंडी बांधकामाला किती
वीटा, किती सिमेंट, किती लाद्या लागतील ते सांगतात, तेव्हा ते गणितच
करतात. गणितातल्या संज्ञा म्हणजे जटील शब्दच केवळ घाबरविणारे असतात.
बाकी गणित सोपे असते, अगदी आपल्या अवतीभवती असते. |